आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाने केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटमध्ये मोहन भागवत यांचा फोटो असून ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘एक तासभर मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्याचे तुम्ही कौतुक करू शकता, दिवसात फक्त 6-7 तास खेळणारा खेळाडू त्याला आयकॉन बनवू शकतो, मग आमचे पंतप्रधान वयाच्या ६७ व्या वर्षी देशासाठी १५-१६ तास काम करणाऱ्यांना आपण आदर्श का मानू शकत नाही?’